Farmer Crop Insurance : या जिल्ह्यातील 6 लाख शेतकऱ्यांना मिळणार पिकविम्याचे 853 कोटी रुपये, तारीख जाहीर कृषी मंत्र्याची मोठी घोषणा

Farmer Crop Insurance : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा जनसन्मान यात्रा दौरा नाशिकमध्ये आहे. या दौऱ्यावर आलेले कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची घोषणा केली आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या सुमारे पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात 853 कोटी रुपयांची विमा रक्कम जमा करण्यात येणार आहे. 31 ऑगस्टपूर्वी आपल्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील पीक विमा आणि कृषीविषयक समस्यांबाबत पुढील आठवड्यात मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला पिक इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी, छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे, नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. 

धनंजय मुंडे काल जन सन्मान यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींशी तसेच शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी प्रलंबित विमा प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आज सकाळी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे व अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली.  

Leave a Comment