Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता या तारखेला जमा होणार आहे

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी ‘लाडकी बहीण योजना’ची घोषणा केली. या योजनेला राज्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. आतापर्यंत राज्यात 2 कोटी 26 लाखांहून अधिक बहिणींच्या खात्यात योजनेचे पैसे जमा करण्यात आले आहेत. मात्र, सध्या योजनेचे हप्ते तूर्तास थांबवण्याचा निर्णय महिला व बालकल्याण खात्याने घेतला आहे. 

राज्यात विधानसभा निंवडणुक असल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे तूर्तास योजनेचे हप्ते हे थांबवण्यात आले आहेत. आचारसंहिता असल्याने तब्बल 10 लाख महिला नोव्हेंबर महिन्याच्या हफ्त्यापासून वंचित राहिल्या आहेत. तर, सरकारने इतर महिलांच्या बँक खात्यावर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता आधीच जमा केला आहे. 

ऑक्टोबर महिन्यातच महिलांच्या खात्यावर 3 हजार जमा करण्यात आले आहेत. मात्र, वेळेअभावी केवळ 10 लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. आता महिला या डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याची वाट बघत आहेत. आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तसेच, सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे देखील एकत्रित जमा केले आहेत. त्यामुळे महिलांना आता डिसेंबरमधील हप्ता कधी मिळणार, याची प्रतिक्षा आहे.

Leave a Comment