Ladki Bahin Yojana New Update : या महिलांसाठी महत्त्वाची अपडेट!महायुती सरकारची महत्वाकांक्षी असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’संपूर्ण महाराष्ट्रात तुफान चर्चेत आहे. याअंतर्गत जुलै ते नोव्हेंबर असे 1500 रूपयांचे 5 हफ्ते म्हणजेच 7,500 रूपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
पण, अनेक महिलांना काहीच मिळालेलं नाही आहे. त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. यामागील कारण म्हणजे या योजनेचा लाभ घेताना पात्र ठरण्यासाठी ज्या अटी, निकष आहेत त्यासाठी त्या महिला पात्र नसाव्यात.
अर्ज भरणाऱ्या महिलांपैकी काहींचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त असेल किंवा त्यांच्या घरातील व्यक्ती सरकारी नोकरदार असेल अशा महिला पात्र ठरत नाहीत. त्याचवेळी काही महिलांकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड नसल्यामुळे त्या योजनेपासून वंचित राहिल्या.
उर्वरित पात्र महिलांबद्दल बोलायचं झालं तर, कदाचित त्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल किंवा त्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी असतील त्यामुळे त्यांच्या खात्यात एकही रूपया जमा झालेला नसावा.