Today’s Monsoon alert : महाराष्ट्रात सध्या मान्सूनचा जोर वाढत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे राज्यातील काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, येत्या ४८ तासांत राज्यात पावसाचा जोर वाढेल.
आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्यभर पावसाचा जोर कायम राहणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषत: विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे.
विदर्भातील भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या भागात अतिशय जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता पुणे जिल्ह्यात येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगण्यात आले. या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.